Monday, August 14, 2017

आरती

श्री सुचितदादांची आरती
कोण आहे तू सांग मलाकोण आहे तू सांग मला,
आरती करूकुरवंडी करू,
सुचितदा भक्ति द्या जरा lधृl
कोण आहे ....

काळ सांगे जगाजन्मो जन्मी सखा,
पूर्ण बंधू असे हा खरा ll
कोण आहे ....

कधी होसी बडाकधी होसी छोटा,
कधी निर्जीव दंडु परा ll
कोण आहे ....

बापू देई छायासर्व साऱ्या जगा,
छत्र धरिसी तू बापू शिरा  ll
कोण आहे ....

बापू घेई निद्रामाय लावी तंद्रा,
तूचि डोलसी क्षणोक्षणा ll
कोण आहे ....

ओळखले तुलागवसले मला,
तूचि विशेष क्षेमरुपा ll
कोण आहे ....











श्री नंदामातेची आरती
 ओवाळू आरती नंदे अनिरुद्धप्रिये,
नंदे अनिरुद्धप्रिये l
पतिप्रेमाची मूळ रागिणीपति प्रेमाची मूळ रागिणी,
अविरत सुखवरदे llधृ.ll

अनिरुद्धाची शक्ती नंदा अवतरली जगती,
नंदा अवतरली जगती l
मन बुद्धिचे दीपमन बुद्धिचे दीप लावूनि
ओवाळू आरती  llll

ओवाळीता मन माझे ठाकले ठायी,
मन ठाकले ठायी l
कोटी तारकांचीकोटी तारकांची शोभा
तुझिया पायी llll

शुभाशुभ दोन्ही नमिती कर जोडोनी,
नमिती कर जोडोनी l
प्रारब्धाच्या विशाल भिंती,
प्रारब्धाच्या विशाल भिंती तुची तोडिसी llll

हरि माझा गे भोळाभाळा तुझा आज्ञांकित,
हरि तुझा आज्ञांकित l
आल्हादिनी तू राधाआल्हादिनी तू राधा
रखमा वामांगी सुंदर llll

तुझिया छायेत आम्हा कमी काही नाही,
आम्हा कमी काही नाही l
सरले कष्ट अमुचेसरले कष्ट अमुचे,
सुखी झालो संसारी llll







श्री बापूंची आरती
आरती अनिरुद्धा, बापू पूर्ण ब्रह्म शुद्धा, बापू पूर्ण ब्रह्म शुद्धा,
कृपाकटाक्षे सुखविसी, कृपाकटाक्षे सुखविसी, मज पूर्णानंदा l
जय जय अनिरुद्धा ll
अज्ञानाचा नाश करुनी तू प्रकटविसी ज्ञाना l बापू प्रकटविसी ज्ञाना,
पापशुद्धी चा मार्ग दावूनी, पापशुद्धी चा मार्ग दावूनी, संपविसी भोगा l
जय जय अनिरुद्धा ll
भक्तीरसाचा उद्गाता तू प्रगटलासी रामा, बापू प्रगटलासी रामा,
सद् धर्माचा बाण सोडूनी, सद् धर्माचा बाण सोडूनी, मारिसी कलीकाला l
जय जय अनिरुद्धा ll
स्वयंप्रकाशी स्वयंतेज तू घननीळा कृष्णा बापू घननीळा कृष्णा,
असंख्य क्रीडा लीला करुनी, असंख्य क्रीडा लीला करुनी, पुरविसी सत्कामा l
जय जय अनिरुद्धा ll
अफाट शक्ती पूर्णपुरूष तू देसी पुरुषार्था बापू देसी पुरुषार्था,
तुझिया चरणी भाव अर्पुनि, तुझिया चरणी भाव अर्पुनि, मी झालो तुझा l
जय जय अनिरुद्धा ll


श्री बापूंची आरती
ओवाळू आरती माझ्या सावळ्या राजा l
ओवाळू तुज देहदीपेअनिरुद्धा सघना llधृ.ll
षड्.रिपूदमनादानवहननाभव संकटहणा l
दिनकर अघभयहारक तारकभक्तकाजवरणा llll
अकारण कारुण्याची छाया तुची धरिसी देवा l
तुझीच व्हावी भावे सेवादे अगणित गुण ठेवा llll
फळले भाग्य माझेधन्य झालो संसारी l
भेटला अनिरुद्धतेणे धरियेले करी llll








आरती अनिरुद्धा

आरती अनिरुद्धा, बापू पूर्णब्रह्म शुद्धा ।
बापू पूर्णब्रह्म शुद्धा ।
कृपाकटाक्ष सुखकर, कृपाकटाक्ष सुखकर
हे  पूर्णानंदा । ॐ जय जय अनिरुद्धा ।।

अज्ञान का नाश करके प्रकटाते हो ज्ञान।
बापू प्रकटाते हो ज्ञान।
पापशुद्धी का मार्ग दिखाकर, पापशुद्धी का मार्ग दिखाकर,
नाश करते हो भोग । ॐ जय जय अनिरुद्धा ।। १ ।।

भक्तिरस के उद्गाता तुम प्रकट हुए हो राम ।
बापू प्रकट हुए हो राम ।
सद्धर्म के बाण से तेरे ,सद्धर्म के बाण से तेरे
नष्ट हुआ कलिकाल । ॐ जय जय अनिरुद्धा ।। २ ।।

स्वयंप्रकाशी स्वयंतेज तुम घननील कृष्णा ।
बापू घननील कृष्णा ।
असंख्य क्रीडा लीलाओं से, असंख्य क्रीडा लीलाओं से
पूर्ण हुए सत्काम । ॐ जय जय अनिरुद्धा ।। ३ ।।

अपार शक्ती पूर्ण पुरुष तुम देते हो पुरुषार्थ ।
बापू देते हो पुरुषार्थ ।
भाव समर्पित कर चरणोंमें, भाव समर्पित कर चरणोंमें,
हो गया मैं तेरा । ॐ जय जय अनिरुद्धा ।। ४ ।।




आरती साई बाबा
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा l चरनरजातलि |
द्यावा दासा विसावा | भक्ता विसावा   आरती साई बाबा
जाणुनिया अनंग | सस्वरुपी राहे दंग | मुमुक्षुजना दावी |
निज डोळा | श्रीरंग डोळा श्रीरंग आरती
जया मनी जैसा भाव | तयातैसा अनुभव | दाविसी दयाघना |
ऐसी तूझी ही माव | तुझी ही माव आरती
तुमचे नाम ध्याता | हरे संस्क्रुतिव्यथा | अगाध तव कारणी।
मार्ग दाविसी अनाथा | दाविसी अनाथा आरती
कलियुगी अवतार। सगुण परब्रह्म साचार। अवतीर्ण झालासे।
स्वामी दत्त दिगंबर | दत्त दिगंबर | आरती
आठां दिवसा गुरुवारी। भक्त करिती वारी। प्रभुपद पहावया।
भवभय निवारी | भय निवारी॥ आरती
माझा निजद्रव्य ठेवा। तव चरणरजसेवा। मागणे हेची आता।
तुम्हां देवाधिदेवा | देवाधिदेवा॥ आरती
इच्छित दीन चातक। निर्मल तोय निजसुख। पाजावें माधव या।
सांभाळ आपुली भाक | आपुली भाक॥ आरती



 श्री गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झरके माल मुक्ताफळाची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || जय देव
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥२॥ जय देव
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥ जय देव


श्री मारुतीची आरती
सत्राणें उड्डाणें
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी
जय देव जय देव जय हनुमंता
तुमचे नि प्रसादें भीं कृतांता ध्रु०
दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द
थरथरला धरणीधर मानीला खेद
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद
रामीं रामदासा शक्तीचा बोध जय देव०


श्री दत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी ये ध्याना ॥१॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥






दुर्गे दुर्घट भारी
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट नेवारी
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी
तुजवीण भुवनी पाहत तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु बोलवे काही
साही विवाद करिता पडिलो प्रवाही
ते तू भक्ता लागे ते तू दस लागे पावस लवलाही
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी



श्री विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥












श्री पांडुरंगाची आरती
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे धृ.
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी
येई हो विठ्ठले माझे माऊली ये

श्री स्वामी समर्थ
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था...
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा॥धृ॥
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी।
जगउध्दारासाठी राया तू फिरसी
भक्तवत्सला खरा, तू एक होसी।
म्हणूनी शरण आलो, तुझे चरणाशी ॥१॥ जय
त्रैगुण परब्रम्ह, तुझा अवतार।
त्याची काय वर्णू, लीला परामर॥
शेषादिक शिणले , लगे त्या पार।
जेथे जडमूढ कैसा , करु मी विस्तार ॥२॥ जय
देवादि देवा, तू स्वामीराया।
निर्जर मुनिजन ध्यातो, भावे तंव पाया।
तुजसि अर्पण केली, आपुली ही काया॥
शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥ जय
अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले।
किर्ती ऐकूनी कानी, चरणी मी लोळे॥
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले।
तुझ्या सुता लगे, चरणा वेगळे ॥४॥ जय



श्री शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा,
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा,
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले,
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले,
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी,
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी,
रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥










श्री शंकराची आरती 
जय शिव ॐकाराप्रभू हर शिव ॐकारा  ब्रह्मा विष्णु सदाशिव
ब्रह्मा विष्णु सदाशिवअर्द्धांगी दारा 
 हर हर महादेव ॥१॥
एकानन चतुरानन पंचानन राजे  शिव पंचानन राजे,
हंसासन गरूड़ासनहंसासन गरूड़ासनवृषवाहन साजे 
 हर हर महादेव ॥२॥
दोयभुज चार चतुर्भुजदशभुज ते सोहे  शिव दशभुज ते सोहे
तीनोरूप निरखतातीनोरूप निरखतात्रिभुवनजन मोहे 
 हर हर महादेव ॥३॥
अक्षमाला वनमाला रूंडमाला धारी  शिव रूंडमाला धारी
चंदनमृगचंदाचंदनमृगचंदा भाले शुभकारी 
 हर हर महादेव ॥४॥
श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे  शिव व्याघ्रांबर अंगे
सनकादिक प्रभुतादिकसनकादिक प्रभुतादिकभूतादिक संगे 
 हर हर महादेव ॥५॥
लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे  शिव सावित्री संगे
पारबती अर्धांगेपारबती अर्धांगेशिरी जटा गंगे
 हर हर महादेव ॥६॥
करमा एक कमंडलु चक्र त्रिशूलधर्ता  शिव चक्र त्रिशूलधर्ता
जगकर्ता जगभर्ताजगकर्ता जगभर्ताजग पालनकर्ता
 हर हर महादेव ॥७॥
काशी में विश्वनाथ विराजेनंदो ब्रह्मचारी  शिव नंदो ब्रह्मचारी
नितप्रति भोग लगावतनितप्रति भोग लगावतमहिमा अतिभारी 
 हर हर महादेव ॥८॥
ब्रह्मा विष्णु सदाशिवजानत अविवेका  शिव जानत अविवेका
प्रणवाक्षर  मध्येप्रणवाक्षर  मध्येये तीनों एका 
 हर हर महादेव ॥९॥
त्रिगुणाजीकी आरती जो कोई नर गावे  शीव जो कोई नर गावे
कहे शिवानंद स्वामीकहे शिवानंद स्वामीसुख संपत्ती पावे 
 हर हर महादेव ॥१०॥






 श्री गायत्री मातेची आरती 
जय देवी जय देवी जय गायत्री माते l
सदभावे ओवाळू जय प्रणवातीते ll धृ.ll
अनादी अनंत अतकर्य माये तव लीला l
स्वेच्छेने उपजविले विधी हरी शंभूला l
विधी सृजी जग हरी पोषी हर संहाराला l
प्रेरिसी योगमाये कळे कवणाला ll  ll
पांचामुखी पंचतत्वे निर्मियली l
पंचीकरणे विविध सृष्टी रचियेली l
अहंभावे तया स्फुरवूनी कृती केली l
माते तुज स्तविती त्यांची मति भ्रमली ll  ll
गाता तुज तरति म्हणूनि गायत्री नांव l
भुक्ति मुक्ती साधती भवभया ठाव l
सत्वातीता ब्रह्म रुपिणी हा भाव l
धरिति जे ज्ञाने त्या नच दुखः वाव ll  ll
आदिमाये तुते विसरले लोक l
धर्म हानि होईल पडला हा धाक l
ग्रासुनि दैन्ये भ्रमुनि नुरला विवेक l
स्मरता तुजला अनुदिनी सकलही हो पाक ll  ll
त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुगुटाते l
वरदाभय चक्र गदा कपाल शंखाते l
द्वीपद्म अंकुश कश कर कमलासनस्थिते l
मोह निवारून माते उध्दरी आम्हांते ll  ll














मंत्रपुष्पांजलि
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: स्वस्ति
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

घालीन लोटांगण
घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हर राम, राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे